जवळपास फक्त २५ टक्के एल ई डी बल्ब चांगले बाकी घातक

मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017 (17:20 IST)

आपण सर्व आपल्या घरात हल्ली एल ई डी बल्ब लावत आहोत. मात्र त्यात मोठा धोका आहे असे सर्वेतून समोर आले आहे. यामध्ये आपल्या देशात विकले जाणारे ७६ टक्के एलईडी बल्ब हे निकृष्ट दर्जाचे आहे. बल्ब मधून   निघणारा गॅस तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे, असा दावा नीलसन या संस्थेने आपल्या अहवालात केला आहे. त्यामुळे एल ई डी बल्ब वर शंका निर्माण झाली आहे. यामध्ये आपल्या देशातील नीलसन ही एक स्वयंसेवी सामाजिक  संस्था आहे. यांनी बाजारात मिळणारे उत्पादन त्यांचा दर्जा व त्याचा नागरिकांवर होणारा परिणाम यावर ऑगस्टमध्ये सर्व्हे पूर्ण केला आहे. यामध्ये आपल्या देशातील प्रमुख शहरे  मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, हैद्राबाद हा सर्व्हे करण्यात आला होता. यात या सर्व शहरात सरकारने आखून दिलेले सुरक्षेचे नियम न जुमानता  निकृष्ट दर्जाच्या स्वस्त एलईडी बल्बची विक्री सर्रासपणे सुरू  होत आहे.  या बल्बमधून विशिष्ट प्रकारचा गॅस बाहेर पडत असून त्याचा मानवी शरीरावर घातक परिणाम होत असल्याचेही या सर्व्हेत समोर आले. सरकारने काही निर्माण करण्या पेक्षा जे आहे ते नीट दिले तर सामान्य नागरिक खुश होतील  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती