भारतात लॉन्च झाली KTM 125 Duke

शनिवार, 23 फेब्रुवारी 2019 (11:18 IST)
केटीएमने आपली नवीन बाइक केटीएम 125 ड्यूक भारतात लॉन्च केली आहे. या बाइकची डिझाइन जवळपास केटीएम 200 ड्यूकसारखे दिसते. दोन्ही बाइक्समध्ये फरक करण्यासाठी कंपनीने केटीएम 125 ड्यूकच्या ग्राफिक्सची पुन्हा रचना केली आहे. केटीएम 125 ड्यूक एक्स शोरूम (दिल्ली)ची किंमत 1,18,163 रुपये आहे.
 
केटीएम 125 ड्यूक सिंगल चॅनल एबीएस युनिटसह बाजारात उतरली आहे. 200 ड्यूकमध्ये देखील सिंगल चॅनल एबीएसच आहे. तथापि केटीएम 390 ड्यूकमध्ये कंपनीने ड्युअल चॅनल एबीएस वापरले आहे. 125 ड्यूकच्या लाँचिंग सोबतच 125 सीसी सेगमेंटमध्ये ही पहिली एबीएस फीचर्स बाइक आहे.
 
केटीएम 125 ड्यूक मध्ये 124.7 सीसीचा लिक्विड कूल्ड सिंगल सिलिंडर DOHC मोटर दिले आहे, जे बाइकला 9,250 आरपीएमवर 14.5 14.5 हॉर्स पवाराची शक्ती आणि 8000 आरपीएमवर 12 एनएमची टॉर्क प्रदान करते. तिथेच या बाइकमध्ये 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन आहे. या बाइकमध्ये 43MM यूएसडी फ्रॉक आणि एक ऍडजेस्टबेल मोनोशॉक दिला आहे. या बाइकचा सामनातर कोणत्याही बाइकबरोबर नाही होऊ शकत, कारण या सेगमेंटमध्ये अशी कोणतीही बाइक नाही आहे. तथापि, हिला टीव्हीएस अपाचे आरटीआर 200 4व्ही एबीएस आणि बजाज पल्सर एनएस 200 सोबत सामना करवू शकतो कारण की या बाइक्सची किंमत देखील याच्या जवळपासच आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती