मुंबई, 11 जानेवारी 2023: महाकाल मंदिर आणि श्री महाकाल महालोक मध्ये जिओ True 5G सेवा सुरू केल्यानंतर, जिओ ने आता उज्जैन या धार्मिक शहरात जिओ True 5G सेवा सुरू केली आहे. इंदूर येथे होत असलेल्या प्रवासी भारतीय दिवस आणि ग्लोबल इन्व्हेस्टर समिटच्या पार्श्वभूमीवर, जिओने दुसर्या शहरात आपले 5G नेटवर्क मजबूत केले आहे.
रिलायन्स जिओ आता राज्यातील 5 प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा देणारी पहिली आणि एकमेव टेलिकॉम ऑपरेटर बनली आहे. यापूर्वी जिओने इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर आणि जबलपूरमध्ये ट्रू 5जी सेवा सुरू केली आहे.
उज्जैन हे भारतातील एक अतिशय महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे आणि जगभरातून लाखो लोक येथे दररोज भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी येतात. उज्जैनमध्ये जिओ True 5G लाँच केल्यामुळे, उज्जैनचे अभ्यागत आणि लोक आता त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांशी जोडले जातील आणि जिओ च्या जागतिक दर्जाच्या जिओ True 5G नेटवर्कचा लाभ घेऊ शकतील.