...म्हणून सरकारला पेट्रोल-डिझेलवरचा टॅक्स हटवणं अशक्य - बाबा रामदेव

रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (10:05 IST)
पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पण योगगुरू बाबा रामदेव यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा बचाव केला आहे. सरकारला पेट्रोल आणि डिझेलवरचा टॅक्स हटवणं का अशक्य आहे, याचं कारण त्यांनी सांगितलं.
 
नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले, "कच्च्या तेलाच्या किंमतीच्या प्रमाणात पेट्रोल डिझेल विकले गेले तर दोन्ही स्वस्त होतील. पण इंधनावर टॅक्स लावला जातो.
 
देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी टॅक्स आवश्यक आहे. त्यामुळेच सरकारला टॅक्स हटवणं अशक्य होत आहे, असं बाबा रामदेव म्हणाले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती