महागाईचा भडका :एलपीजी सिलेंडर 1000 रुपयांच्या पुढे जाऊ शकते, तेलाच्या किमतीतही वाढ

शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (09:50 IST)
सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे.ऐन सणासुदीच्या काळात स्वयंपाकाच्या गॅससाठी तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागू शकते. गेल्या आठवडाभरापासून,जिथे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत, तिथे एलपीजी सिलेंडरच्या किंमती देखील वाढू शकतात. किंमतीत गॅस 1000 चा आकडा पार करू शकते. तसे, 18 दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करून त्याची सुरुवातही झालीच आहे.
 
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. गेल्या दहा दिवसांत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ऑगस्टमध्ये कच्च्या तेलाची किंमत 74.22 डॉलर प्रति बॅरल होती. सप्टेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती 75 डॉलरच्या पुढे जाऊ शकते. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढवण्याचा ट्रेंड कायम राहिल्यास त्याचा परिणाम तेलाच्या किमतींवर होईल, असे मानले जाते. अशा परिस्थितीत आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढू शकतात.
 
जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किंमती वाढल्या तर स्वयंपाकाचा गॅस देखील महाग होईल. यासह, सरकार एलपीजी सबसिडी पूर्णपणे काढू शकते.मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अनुदान फक्त प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिले जाऊ शकते.त्याचबरोबर सरकारच्या अंतर्गत सर्वेक्षणात ग्राहकांना एक हजार रुपयांचे सिलिंडर खरेदी करावे लागू शकते.हे मान्य करण्यात आले आहे.
 
मंत्रालयाने अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. पण लवकरच सरकार या संदर्भात निर्णय घेऊ शकते. या वर्षी 1 जानेवारीनंतर राजधानी दिल्लीत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 190.50 रुपयांची वाढ झाली आहे, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत किंमत दुपटीने वाढली आहे. सध्या देशातील निवडक राज्यांमध्ये एलपीजी सिलिंडरवरील सबसिडीचा लाभ ग्राहकांना मिळत आहे. यामध्ये लडाख लक्षद्वीप,अंदमान आणि निकोबार, उत्तर-पूर्वी कडील राज्ये आणि काही राज्यांचा मागास भाग यांचा समावेश आहे. सरकारने आर्थिक वर्ष 2021 मध्ये DBT अंतर्गत अनुदानावर 3559 रुपये खर्च केले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती