Abu Dhabi/Mumbai: अबू धाबी केमिकल्स डेरिव्हेटिव्ह कंपनी RSC लिमिटेड (TA'ZIZ) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) यांनी TA'ZIZ EDC आणि PVC प्रकल्पासाठी औपचारिक भागधारक करारावर स्वाक्षरी केली. भागधारक करार $2 अब्ज किमतीचा आहे. ताजीझ इंडस्ट्रियल केमिकल्स झोन, रुवाईसमध्ये हा संयुक्त उपक्रम उभारला जाणार आहे.
TAZIZ EDC आणि PVC संयुक्त उपक्रम क्लोर-अल्कली, इथिलीन डायक्लोराईड (EDC) आणि पॉलीविनाइल क्लोराईड (PVC)साठी उत्पादन सुविधा तयार करेल आणि ऑपरेट करेल. संयुक्त अरब अमिरातीमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या रसायनांची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे स्थानिक उत्पादकांसाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील.
रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी ADNOC मुख्यालयाच्या भेटीदरम्यान औपचारिक भागधारक करारावर स्वाक्षरी केली. अंबानी यांनी महामहिम डॉ. सुलतान अल जाबेर, UAE चे उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान मंत्री आणि ADNOC व्यवस्थापकीय संचालक आणि समूह CEO यांची भेट घेतली आणि हायड्रोकार्बन मूल्य साखळी, नवीन ऊर्जा आणि डीकार्बोनायझेशनमधील भागीदारी आणि वाढीच्या संधींवर चर्चा केली.
मुकेश अंबानी म्हणाले: "रिलायन्स इंडस्ट्रीज आणि TA'ZIZ मधील संयुक्त उपक्रमाची जलद प्रगती पाहून मला खूप आनंद झाला आहे. हा संयुक्त उपक्रम भारत आणि UAE मधील मजबूत संबंधांचा साक्षीदार आहे. UAE ला मुक्त व्यापाराचा फायदा होईल. या वर्षी फेब्रुवारीमध्ये या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला चालना मिळणार आहे."