भारतीय रेल्वेने IRCTC अॅप आणि वेबसाइटवर तिकीट बुकिंग मर्यादा दुप्पट केली
सोमवार, 6 जून 2022 (20:53 IST)
IRCTC Ticket Booking Limit Increase: रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. तुम्ही रेल्वे तिकीट ऑनलाइन बुक केल्यास, आता तुम्हाला एका महिन्यात आणखी तिकिटे बुक करण्याची संधी मिळेल. वास्तविक, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने एका यूजर आयडीवरून जास्तीत जास्त 12 तिकिटे बुक करण्याची मर्यादा 24 पर्यंत वाढवली आहे.
भारतीय रेल्वेने IRCTC अॅप किंवा वेबसाइटवर केल्या जाणाऱ्या तिकीट बुकिंग मर्यादेत दुप्पट वाढ केली आहे. तुम्ही आयआरसीटीसी अॅप किंवा वेबसाइटवरून तिकीट बुक केल्यास.अशा परिस्थितीत आता तुम्ही एका महिन्यात पूर्वीपेक्षा दुप्पट तिकीट बुक करू शकाल. यापूर्वी, एका IRCTC युजर आयडीवरून फक्त 6 तिकिटे बुक करता येत होती. आणि आता ही मर्यादा वाढवून 12 करण्यात आली आहे. म्हणजेच, आता तुम्ही तुमच्या IRCTC यूजर आयडीवरून एका महिन्यात एकूण 12 तिकिटे बुक करू शकाल. भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे जे लोक नियमितपणे लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करतात त्यांना मोठा फायदा होणार आहे. भारतीय रेल्वेने सोमवारी या निर्णयाची माहिती दिली.
यापूर्वी, फक्त एका IRCTC युजर आयडीने फक्त 6 तिकिटे बुक करता येत होती. तर, तिकीट बुकिंगची मर्यादा वाढवण्यासाठी, व्यक्तीला त्याच्या आधारशी IRCTC युजर आयडी लिंक करणे आवश्यक होते. एकदा आधार लिंक झाल्यानंतर तो एका महिन्यात 12 तिकिटे बुक करू शकत होता.
भारतीय रेल्वेच्या या निर्णयानंतर, एक व्यक्ती एका महिन्यात 12 तिकिटे बुक करू शकते. तर ज्यांचे आयआरसीटीसी खाते आधार कार्डशी लिंक आहे. ते त्यांच्या IRCTC यूजर आयडीने एका महिन्यात 24 तिकिटे बुक करू शकतील.
यापूर्वी, आयआरसीटीसीच्या कमी तिकीट बुकिंग मर्यादेमुळे, अनेक प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागले होते, जे त्यांच्या कामानिमित्त वारंवार प्रवास करत होते. त्याच वेळी, तिकीट बुकिंग मर्यादा वाढल्यामुळे त्यांना खूप फायदा होईल. तिकीट बुकिंग मर्यादा वाढवण्याच्या भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे अनेक प्रवासी आनंदी दिसत आहेत.
तुमचे IRCTC खाते आधारशी कसे लिंक करावे -
* यासाठी प्रथम तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइट http://irctc.co.in ला भेट द्यावी लागेल.
* त्यानंतर तुमची लॉगिन माहिती टाकून साइन इन करा.
* आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला My Account चा पर्याय निवडावा लागेल.
* त्यानंतर Link Your Aadhaar KYCया पर्यायावर क्लिक करा.
* नंतर तुम्हाला बॉक्समध्ये तुमच्या आधार कार्डशी संबंधित आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल.
* तपशील भरल्यानंतर, तुम्हाला ओटीपी पाठवण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
* काही वेळाने तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो काळजीपूर्वक एंटर करा आणि त्याला व्हेरिफाय करा.
* ही प्रक्रिया केल्यानंतर काही वेळाने तुमचे केवायसी पूर्ण होईल.
* KYC झाल्यावर तुम्ही एका महिन्यात 24 तिकिटे सहजपणे बुक करू शकता.