आता राज्यात घरपोच दारूची डिलिव्हरी बंद होणार, गृह विभागाचे उत्पादन शुल्क आयुक्तांना पत्र

गुरूवार, 2 जून 2022 (12:13 IST)
एका रिपोर्टप्रमाणे महाराष्ट्र सरकार दारूची होम डिलिव्हरी बंद करण्याचा विचार करत आहे. यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र उत्पादन शुल्क आयुक्तांना पत्र लिहून आता दारूची होम डिलिव्हरी होणार नाही, असे पत्र दिल्याचे समजत आहे. 
 
सध्या कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे मागे घेण्यात आली आहेत, त्यामुळे ही व्यवस्था देखील मागे घेण्यात येत आहे. या पत्रात उत्पादन शुल्क विभागाला दारू उद्योगातील सर्व संबंधितांना माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.
 
कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी काही नियम तयार करण्यात आले होते मात्र आता नियम हळूहळू बदलण्यात येत आहेत. त्या दरम्यान महाराष्ट्र सरकारने महसूल बुडत असल्याचे कारण देत दारू दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली होती तसेच दुकानांवर गर्दी होऊ लागल्यामुळे दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला गेला होता. सोबतच काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करून दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली होती.
 
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार महाराष्ट्र सरकार दारूची होम डिलिव्हरी बंद करण्याचा विचार करत आहे. यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र उत्पादन शुल्क आयुक्तांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती