लिंबू दरात मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

बुधवार, 1 जून 2022 (19:33 IST)
गेल्या दोन महिन्यांपासून लिंबाचे दर वधारले होते. लिंबाच्या दराने उच्चांक गाठला होता. लिंबाचे दर 10 ते 15 रुपये झाले होते. आता लिंबाचे दर घसरले असून लिंबू 2 ते 3 रुपयांनी मिळत आहे. लिंबाच्या दरात झालेल्या घसरण मुळे शेतकरी चिंतेत आला आहे. उत्पादन झालेल्या लिंबाचे दर उतरल्यामुळे आता त्याचे काय करावे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. 
 
मुंबई, पुणे, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात लिंबूच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मुंबईत 7500 रुपये क्विंटल भावाने लिंबाची विक्री होत आहे. तर पुणे- 9000 रूपये, जळगाव- 6500 रूपये, अमरावती- 7400 रूपये, नागपूर- 6500 रूपये, कोल्हापूर- 4800 रूपये क्विंटलच्या भावाने मिळत आहे. महिन्यापूर्वी लिंबू बाजारात 400 रुपये किलोच्या भावाने विकले जात होते. तर महिन्या भरात लिंबाचे भाव घसरले. विक्रेत्यांच्या म्हण्यानुसार, लिंबाचे जास्त उत्पादन आणि मंडईत जास्त आवक झाल्यामुळे लिंबाचे दर घसरले आहे.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती