जीएसटीमुळे खाण्याच्या वस्तू स्वस्त होतील

जीएसटीमुळे खाणाच्या वस्तू स्वस्त होतील, असा दावा केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी केला आहे. खाण्याच्या वस्तू पाच टक्के कराच्या कक्षेत ठेवल्याने या वस्तू निश्चितपणे स्वस्त होतील, असे त्यांनी म्हटले आहे.
 
येत्या एक जुलैपासून वस्तू व सेवा कर कायदा लागू होणार आहे. खाण्याचे जवळपास 12 हजार वस्तूंना जीएसटीसाठी मंजुरी देण्यात आली असल्याचेही अन्न प्रक्रिया मंत्री बादल यांनी या अनुषंगाने सांगितले.

वेबदुनिया वर वाचा