जीएसटी जगातील सर्वात गुंतागुंतीची कर प्रणाली

शनिवार, 17 मार्च 2018 (17:07 IST)

सरकारने लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकावर (जीएसटी) जागतिक बँकेने गुंतागुंतीचा ठपका ठेवला आहे. जागतिक बँकेने नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार, भारतामध्ये नव्याने लागू करण्यात आलेली कर प्रणाली प्रक्रिया ही जगातील सर्वात गुंतागुंतीची आहे. 

जागतिक बँकेच्या रिपोर्टनुसार, भारतीय भारतीय कर प्रणालीचा दर २८ टक्के इतका आहे. जगातील ११५ देशांत भारतातील कर दर सर्वाधिक आहे. नव्या कर प्रणालीची प्रक्रिया देखील गुंतागुंतीचे असल्याचा उल्लेख या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला आपल्याकडे काही वस्तूंवर  ५, १२, १८ आणि २८ टक्के कर आकारला जातो. तर काही वस्तू करमुक्त आहेत. सोन्यावर ३ टक्के कर आकारण्यात येत असून  पेट्रोल उत्पादन, वीज आणि रियल इस्टेट जीएसटीतून वगळ्यात आले आहे.

दर दोनवर्षांनी जारी करण्यात येणाऱ्या जागतिक बँकेच्या रिपोर्टनुसार, जीएसटी प्रणालीचा वापर करणाऱ्या ४९ देशांत एकाच दराने कर आकरण्यात येतो.  तर २८ देश दोन टप्प्यात दर आकरणी केली जाते.  भारतासह अन्य पाच देशांमध्ये जीएसटीमध्ये वेगवेगळ्या चार गटात दर आकारणी केली जाते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती