खुशखबर !सोनं चांदी झाले स्वस्त;ताजे दर काय आहे जाणून घ्या

मंगळवार, 29 जून 2021 (19:00 IST)
आपण सोनं खरेदी करण्याचा विचार करीत आहात तर आपल्यासाठी ही खुशखबर आहे.देशात सोन्याचे भाव वाढत आहे त्यामुळे हे घेणं आता सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर जात आहे.कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे लोकांनी सोनं घेण्यास घट केली होती. परंतु आज दिलासादायक बातमी मिळत आहे.सोन्याच्या भावात 2 हजार रुपयांनी घसरण झाली आहे.आजचा सोन्याचा भाव 47 हजार रुपये प्रति तोळा आहे.
 
MCX च्या माहितीनुसार,मंगळवारी बाजार उघडल्यानंतर सोन्याच्या किंमतीमध्ये प्रति तोळा 120 रुपयांनी घसरण झाली आहे. जून महिन्यात सोन्याचे भाव 49 हजार रुपये प्रति तोळे होते.आज भाव 2000 रुपयांनी घसरले आहे. तसेच चांदीच्या भावात देखील घसरण झाली आहे.
 
या पूर्वी चांदीचा भाव MCX च्या माहितीनुसार 72 हजार रुपये प्रतिकिलो होता .आता त्या भावात तब्बल 4000 रुपयांची घट झाली आहे.आज चांदीचा भाव 68 हजार प्रति किलो आहे.
 
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन सोन्याचे दर ठरवतात.या मध्ये स्थानिक आयात कर आणि कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो.देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट MCX आहे.हे मार्केटचा सोन्याचे भाव ठरवतात.जरी सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय पातळीवर फरक असला तरीही काही स्थानिक गोष्टी देखील भावांवर आपले प्रभाव टाकतात. 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती