Gold Silver Price Today:सोने आज पुन्हा घसरले, चांदीची किंमतही कमी झाली, खरेदी करण्यापूर्वी येथे नवीनतम दर तपासा
सध्या सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण सुरूच आहे. अशा परिस्थितीत, आपण सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आपल्यासाठी एक उत्तम संधी आहे. पण घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांच्या नवीनतम किंमती जाणून घेणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. मागील दिवसाच्या घसरणीचा ट्रेंड नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारीही कायम राहिला. एमसीएक्सवर(MCX) सोन्याचा भाव 0.41 टक्क्यांनी घसरून 51,954 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला, तर चांदी 0.27 टक्क्यांनी घसरली. यानंतर चांदीचा भाव 67,306 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे.
दागिने बनवण्यासाठी बहुतेक फक्त 22 कॅरेटचा वापर केला जातो. काही लोक 18 कॅरेट सोने देखील वापरतात. दागिन्यांवर कॅरेटनुसार हॉल मार्क बनवले जाते.उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे देशभरातील सोन्याच्या दागिन्यांची किंमत बदलते.