Gold/Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन-चांदीच्या किमती जाणून घ्या

सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (12:28 IST)
Gold/Silver Price Today:  भारतीय बाजारात आज सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये चढ -उतार व्यवसाय होत आहे. सोमवारी,आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोन्याच्या किंमतीत वाढ आहे.मात्र,चांदीच्या दरात घसरण आहे. सोमवारी,मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर ऑक्टोबर वायदा सोने 0.22 टक्के वाढीसह व्यापार करत आहे.त्याच बरोबर डिसेंबरवायदे चांदीच्या किमतीत 0.35 टक्के घसरण आली आहे.
 
गेल्या ट्रेडिंग सत्रात सोने 0.4 टक्क्यांनी तर चांदी 0.9 टक्क्यांनी घसरली होती. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय  बाजारपेठेत 2.1 टक्क्याची मोठी घसरण झाल्यानंतर आज सोन्याचा भाव 1,787.40 डॉलर प्रति औंसवर स्थिरावला आहे.
 
MCX वर आठवड्याच्या पहिल्या दिवशी ऑक्टोबर वायदा सोन्याचे भाव 101 रुपयांनी वाढून 46,907 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. दुसरीकडे, चांदीची किंमत डिसेंबरमध्ये 0.35 टक्क्यांनी घसरून 63,371 रुपये प्रति किलो झाली. 
 
या आठवड्याच्या अखेरीस अमेरिकन ग्राहकांच्या किंमतीच्या माहितीच्या आधी गुंतवणूकदार सावध आहेत. याशिवाय अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्यावर परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्यात 0.6 टक्के वाढ झाल्यानंतर डॉलर निर्देशांक 92.632 वर पोहोचला.
 
मुंबईत सोन्याचा भाव प्रतितोळा 47070 रुपये झाला आहे.दिल्लीत सोने प्रतितोळे 50340 रुपये आहे.चेन्नईत 48390 रुपये प्रतितोळा तर कोलकातामध्ये 49140 रुपये प्रतितोळा सोन्याचा भाव  आहे.
 
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे की आपण आता गूगल पे वरून सोन खरेदी करू शकता.त्याशिवाय पेटीएम वरून देखील आपण पेमेंट करू शकता.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती