Gold SIlver Price Today : सोन्याच्या दरात घसरण, चांदीचे दर जाणून घ्या

मंगळवार, 11 जून 2024 (10:00 IST)
सध्या सोन्याचे दर वधारले आहे. आता गेल्या शुक्रवार पासून सोन्याच्या दरात 2000 रुपयांहून अधिकची घसरण झाली होती.आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली असून  सोन खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. 
 
आज 22 कॅरेट सोन्याचे दर 100 रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे 10 ग्राम सोन्याचे दर 65,840 रुपये आहे. तर 8 ग्राम 22 कॅरेट सोन्याचे दर 52,672 रुपये आहे. 
 
24 कॅरेट सोन्याचे दर देखील बदलले आहे. सोनं 100 रुपयांनी स्वस्त झाले असून 71,810 रुपये सोन्याचे दर आहे 
 
मुंबईत 24 कॅरेट सोनं 1 ग्राम चे दर 7,166 सून पुण्यात 1 ग्राम सोनं 7,166 रुपयांनी मिळत आहे. 
चांदीचे दर वधारले आहे. 1 किलो चांदीच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली असून आज चांदीचे दर 91,800 रुपये आहे. 
 
जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करत असाल तर गुणवत्तेकडे कधीही दुर्लक्ष करू नका. हॉलमार्क पाहिल्यानंतरच दागिने खरेदी करा, ही सोन्याची सरकारी हमी आहे,  ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ही भारतातील एकमेव एजन्सी हॉलमार्क ठरवते. सर्व कॅरेटचे हॉल मार्क मार्क वेगळे असतात, ते पाहिल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतर तुम्ही सोने खरेदी करावे.

 Edited by - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती