Gold Silver Price Today 21 April 2023 अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. मात्र 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर अजूनही 60,000 रुपयांच्या वरच आहे. काल संध्याकाळी सोन्याचा भाव 60,616 रुपयांवर बंद झाला होता, मात्र आज सकाळपासून मंद अवस्थेत आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, आज सराफा बाजारात सोने 174 रुपयांनी स्वस्त होऊन 60,446 रुपये झाले आहे. उद्या म्हणजेच 22 एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.
IBJA च्या वेबसाइटनुसार, आज चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. चांदी 656 रुपयांनी स्वस्त होऊन 74,763 रुपये किलो झाली आहे. पूर्वी ते 75,419 रुपये भाव होता.