चालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. फेब्रुवारी 2019 पर्यंत पाच टप्प्यांत या सुवर्ण रोखे योजनेमध्ये नागरिकांना गुंतवणूक करता येईल. हे सुवर्ण रोखे बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., विशिष्ट टपाल कार्यालये आणि शेअर बाजारातून विकत घेता येतील. या योजनेतील पहिला टप्पा 15 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत असून गुंतवणूक केलेल्या नागरिकांना 23 ऑक्टोबरपासून हे रोखे मिळतील. यानंतर पाच ते 19 नोव्हेंबर, 24 ते 28 डिसेंबर, 14 ते 18 जानेवारी आणि चार ते आठ फेब्रुवारी या कालावधीत सुवर्ण रोखे विकत घेण्याची संधी असेल. या योजनेतून एका आर्थिक वर्षात एका व्यक्तीला जास्तीत जास्त चार किलो सोने घेता येते. तर, विश्वस्त संस्थांसाठी ही मर्यादा 20 किलोंची आहे. ठोक सोन्याची मागणी कमर करण्याच्या हेतूने नोव्हेंबर 2015पासून या योजनेस सुरुवात करण्यात आली.