ड्रायव्हिंग लायसन्स बदलणार

सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (16:04 IST)
पुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स बदलणार आहे. तसेच नवी गाडी घेणार असलेल्या ग्राहकांच्या गाडीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटही ड्रायव्हिंग लायसन्ससारखंच असणार आहे. विशेष म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्समध्ये सिक्युरिटी फीचर्ससाठी क्यूआर कोडसुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे आरसी बुकही एटीएमसारखेच होणार आहे. या नव्या फिचरमुळे वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांना संबंधित वाहन आणि वाहनचालकाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.  
 
प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासंबंधीच्या सर्व सूचना या कार्डांद्वारेदेण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत वाहनपरवाना व गाडीची कागदपत्रे (आरसी) एका छापील कागदावर दिले जात आहेत. मात्र, नव्याने देण्यात येणाऱ्या वाहनपरवाना आणि आरसी स्मार्टकार्डमध्ये मायक्रोचिप आणि क्यूआर कोड असणार आहे. तसेच या नव्या वाहन परवान्यात एटीएम आणि मेट्रोसारखे निअर-फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) फीचर असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती