Gold Price Today: सोन्याच्या दरात वाढ झाली, चांदी चे भाव वधारले, आजचे दर जाणून घ्या

सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (19:38 IST)
सोन्याच्या किमतीत सोमवारी वाढ झाली. देशाची राजधानी दिल्लीत सोने 478 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आहे. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 49,519 रुपये इतकी नोंदवली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढलेल्या किमती आणि रुपयात झालेली घसरण यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49,041 रुपयांवर नोंदवला गेला होता. सोमवारी तो 478 रुपयांनी वधारला आणि सोन्याचा भाव 49,519 रुपयांवर पोहोचला. दुसरीकडे, भारतीय रुपया घसरला आणि तो प्रति डॉलर 23 पैशांनी घसरून 75.59 वर आला. म्हणजेच एका डॉलरची किंमत 75.59 रुपये इतकी नोंदवली गेली. चांदीच्या दरातही आदल्या दिवसाच्या तुलनेत वाढ झाली आहे.
 
सोन्याचा भाव 49,519 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला, तर चांदीचा भाव 63,827 रुपये राहिला. चांदीची किंमत 1 किलोची आहे. मागील व्यापार सत्राच्या तुलनेत चांदीचा भाव 932 रुपयांनी वधारला. विदेशी चलन बाजारात रुपया 23 पैशांनी घसरून अमेरिकन चलनाच्या तुलनेत 75.59 (तात्पुरती) प्रति डॉलरवर बंद झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, "सोन्याच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयातील घसरणीमुळे न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंज कॉमेक्स मध्ये दिल्लीतील 24 कॅरेटचे स्पॉट गोल्ड 478 रुपयांनी वाढले आहे." आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,857 डॉलर प्रति औंस झाला, तर चांदी 23.02 डॉलर प्रति औंसवर जवळपास स्थिर राहिली. वायदे बाजारात सोमवारी सोन्याचा भाव 539 रुपयांनी वाढून 49,653 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 

वायदा व्यवहारात सोमवारी चांदीचा भाव 1,036 रुपयांनी वाढून 64,024 रुपये प्रति किलोवर पोहोचला मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 1,036 रुपये किंवा 1.64 टक्क्यांनी वाढून 7,930 लॉटमध्ये 64,024 रुपये प्रति किलोवर पोहोचला. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती