देशात सापडली सोन्याची खान

शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 (09:17 IST)
उत्तर प्रदेशच्या सोनभद्र भागात सोन्याची खाण सापडली आहे. पडरक्ष या गावाच्या डोंगराळ भागात सोन्याची खाण असल्याची पुष्टी खाण अधिकाऱ्यांनी केली आहे. खाणीत सोन्याचे दगड मिळू शकतात. खनिज अधिकारी विजय कुमार यांच्या नेतृत्वात ९ जणांची टीमनं  डोंगराळ भागाची पाहणी केली आहे.
 
खनिज संपदेसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सोन्याचा खान सापडल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण जगात हे शहर अधोरेखित झालं आहे. याचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिकांच्या टीमला ४० वर्ष लागले.
 
संबंधित भूमीच्या सीमा ठरवल्यानंतर ई टेंडरिंगची प्रक्रिया सुरु होईल. त्यानंतर खानीत खोदकाम सुरु होईल. ज्या डोंगराळ भागात सोनं असल्याचं म्हटलं जातंय तो भाग १०८ हेक्टरचा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती