जर आपण स्वस्तात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आपल्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. ही संधी आपल्या हातातून जाऊ देऊ नका. केंद्र सरकार आता आपल्याला बाजारापेक्षा कमी दरात सोने खरेदी करण्याची संधी देत आहे. सॉवरेन सुवर्ण बाँड योजनेच्या दहाव्या शृंखलेत, आपण 28 फेब्रुवारी ते 4 मार्च 2022 दरम्यान सोन्यात पैसे गुंतवू शकता. हे सुवर्ण रोखे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे जारी केले जातात .
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मते ,सॉवरेन गोल्ड बाँड योजनेच्या दहाव्या मालिकेची इश्यू किंमत 5,109 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी 9व्या मालिकेचे दर 4,786 रुपये प्रति ग्रॅम होते.
आपण ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर आपल्याला प्रति ग्रॅम 50 रुपयांच्या सवलतीचाही लाभ मिळेल. याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला डिजिटल मोडमध्ये पैसे भरावे लागतील.ऑनलाइन पेमेंट केल्यास , गोल्ड बाँडची इश्यू किंमत 5,059 रुपये प्रति ग्रॅम असेल