जागतिक स्थिती, कच्च्या तेलाच्या भडक्याने बाजाराला विराम!

सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (20:13 IST)
मुंबई :जागतिक बाजारातील नकारात्मक कल आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीच्या परिणामांमुळे भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत.
 
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 231.62 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 65,397.62 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी  दिवसअखेर 82.05 अंकांच्या नुकसानीसह निर्देशांक 19,542.65 वर बंद झाला आहे.
 
मुख्य कंपन्यांच्या स्थितीत औषध क्षेत्रात सर्वाधिक घसरणीची नेंद केली आहे. याच दरम्यान सेन्सेक्समधील 26 समभाग हे नुकसानीत राहिले आहेत. तर जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.90 टक्क्यांनी वधारुन 93.21 अमेरिकन डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचला आहे.
 
सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 26 समभाग हे नुकसानीत राहिले आहेत यावेळी 4 समभाग हे वधारले आहेत. सेन्सेक्सच्या कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, एचसीएल टेक , आयटीसी, पॉवरग्रिड कॉर्प, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक, टाटा मोर्ट्स, इंडसइंड आणि टीसीएस समभाग  यांच्यात काहीशी वाढ राहिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती