अवाजवी वीजबिल येण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. हजारांपासून कोट्यवधीपर्यंत लोकांना वीजबिल देण्यात (electricity bill discount)आले आहे, त्यामुळं एवढ्या रकमेते बिल भरायचे कसे? असा प्रश्न सध्या लोकांसमोर आहे. यातच आता महावितरण विभागाकडून ग्राहकांना विशेष सवलत देण्यात आली आहे.
महावितरण विभागाच्या वतीनं तीन महिन्याचे बिल एकत्रित एकरकमी भरल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे. ग्राहकांना या 2 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तर, मागणी करणाऱ्या ग्राहकांना तीन समान हप्त्यांमध्ये बिल भरण्याची मुभाही देण्यात आली आहे.
वीज नियमक मंडळाच्या वतीनं लॉकडाऊन काळात मीटर रिडिंग व वीजबिल वितरण न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं ग्राहकांना सरासरी बिल देण्यात आले. मात्र वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारी अनेक भागातून समोर आल्या आहेत.
सध्या जून महिन्याच्या बिलाचे वितरण केले जात आहे. दरम्यान ग्राहकांना वीजबिलाबाबत माहिती देण्यासाठी महावितरण विभागाचे मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता यांना सुचना देण्यात आल्या आहेत. त्यातूनही ग्राहकांना फायदा न झाल्यास [email protected] यावर तक्रारींचे निरसण केले जाईल.
वीज दराचा आदेश (electricity bill discount) कोविड-19 च्या लॉकडाउनच्या कालावधी दरम्यान निर्गमित झाल्यामुळे, वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउनच्या नियमांचे पालन करणे शक्य होण्यासाठी आणि ग्राहकांना काहीसा दिलासा देण्यासाठी आयोगाने काही बाबतीत वीज कंपन्यांना परवानगी दिली. उदा. मीटरमधील नोंदी घेण्यासाठी ग्राहकांच्या इमारती/घरी न जाता मार्च ते मे या लॉकडाउनच्या कालावधी दरम्यान (ॲटोमॅटीक मीटर रिडिंगची सुविधा जेथे उपलब्ध आहे त्यांना वगळून) सरासरी वीज वापराच्या आधारावर वीज देयके आकारावीत.
जून 2020 घरगुती ग्राहकांसाठी वीजबिल भरण्याची पद्धत