अनुदानित सिलेंडर साडेचार रुपयांनी महाग

गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (10:16 IST)

स्वयंपाकाच्या गॅससिलिंडरमध्ये बुधवारी दरवाढ झाली असून विनाअनुदानित सिलिंडर ९३ रुपयांनी तर अनुदानित सिलेंडर साडेचार रुपयांनी महागले आहे. गॅसची किंमत दर महिन्याला वाढवून त्यावरील अनुदान संपवण्याचा सरकारने निर्णय घेतल्यानंतर किमतीत करण्यात आलेली ही १९ वी दरवाढ आहे.

प्रत्येक कुटुंबाला वर्षांला १४.२ किलो वजनाचे १२ सिलिंडर अनुदानित दराने मिळू शकतात. त्यानंतर मात्र बाजारभावाने सिलिंडर विकत घ्यावे लागते. अनुदानित गॅसच्या १४.२ किलोग्रॅम वजनाची किंमत ४.५० रुपयांनी वाढवण्यात आल्यामुळे दिल्लीत आता हे सिलिंडर ४९५.६९ रुपयांना मिळेल. विनाअनुदानित किंवा बाजारभावाने मिळणाऱ्या घरगुती गॅसच्या सिलिंडरची किंमतही ९३ रुपयांनी वाढवण्यात येऊन ती ७४२ रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी १ ऑक्टोबरला झालेल्या दर पुनर्निर्धारणात ही किंमत ५० रुपयांनी वाढवून ६४९ रुपये करण्यात आली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती