ओलाच्या ऑटोमध्ये मोफत वायफाय

शनिवार, 4 नोव्हेंबर 2017 (09:41 IST)
ऑटो-कनेक्‍ट वायफाय सुविधेचा कॅब सेवा देणाऱ्या ओला कंपनीने विस्तार केला असून आता ओलाच्या ऑटोमध्ये मोफत वायफाय सुविधा मिळू शकणार आहे. ओलाकडून देशातील 73 शहरांमध्ये ऑटोची सेवा पुरवली जाते. यूझर्सना ओला ऑटोमधील वायफायचा वापर करताना आपला फोन वायफाय सेवेशी एकदाच जोडावा लागेल. ऑटो कनेक्‍ट वायफायद्वारे अधिक आधुनिक बनवण्याचा प्रयत्न असून ओला ऑटोशी ग्राहकांना अधिक चांगल्याप्रकारे जोडण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत.
 
ओला कंपनीने काही दिवसांपूर्वीच दावा केला होता की, 200 टीबीहून अधिक डेटाचा वापर ओला प्राईमच्या ग्राहकांच्या माध्यमातून महिन्याला केला. एक ओला ग्राहक सरासरी 20 एमबी डेटाचा वापर करतो. 2014 मध्ये लॉन्च झालेल्या या ओलाच्या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत 1 लाख 20 हजार हून अधिक नोंदणी झाली. ओलाच्या ऍपमध्ये ऑटो ड्रायव्हरसाठी इंग्रजी आणि हिंदीसह आठ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती