भंगार देऊन नवीन घ्या Flipkart ची धमाल स्कीम

मंगळवार, 27 जून 2023 (12:03 IST)
Flipkart ही भारतातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी आहे, जी नॉन-फंक्शनल इलेक्ट्रॉनिक उत्पादने बदलण्याची धमाल योजना घेऊन आली आहे. एक्सचेंज प्रोग्राम या नावाने ही योजना असून यात ग्राहक त्यांचे भंगार सामान जसे स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, फ्रीज आणि वॉशिंग मशीन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू देऊन भरघोस सूट मिळू शकते. 
 
सोप्या भाषेत सांगायचे तर, जुन्या वस्तू देऊन तुम्ही नवीन वस्तू मिळवू शकाल. मात्र जुन्या मालाची किंमत कंपनी ठरवेल. यानंतर तुम्ही काही अतिरिक्त पैसे देऊन जुन्या वस्तूऐवजी नवीन वस्तू घरी आणू शकाल.
 
फ्लिपकार्टच्या एक्सचेंज प्रोग्राममध्ये ग्राहकांना उत्तम ऑफर्स देण्यात येणार आहेत. यामध्ये बायबॅक ऑफर, अपग्रेड ऑफर यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात फ्लिपकार्टद्वारे तुमच्या घरातील फालतू म्हणजे कामास येत नसलेल्या वस्तू घेतल्या जातील. आणि जर तुम्ही या वस्तूऐवजी नवीन वस्तू खरेदी केली तर ती वस्तू तुमच्या घरी पोहोचवली जाईल. म्हणजे जुना माल घ्या आणि नवीन माल पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी फ्लिपकार्टवर असेल.
 
जुन्या वस्तूंच्या किमती कशा ठरवल्या जाणार?
फ्लिपकार्टचा स्मार्टफोन खरेदीवर एक्सचेंज ऑफर देत असते पण आता कंपनीने एक्सचेंज ऑफरमध्ये मोठ्या उपकरणांचा समावेश केला आहे. यासोबतच एक्स्चेंज ऑफरमध्ये पूर्णपणे जंक उत्पादने देखील समाविष्ट केली जात आहेत. तुमच्या वापरलेल्या वस्तूचे मूल्य सध्याच्या स्थितीवर अवलंबून असेल. तसेच ते उत्पादन किती जुने आहे. याशिवाय तुम्ही ज्या उत्पादनाची देवाणघेवाण करत आहात ते कार्यरत स्थितीत आहे की नाही. हे सर्व घटक तुमच्या वापरलेल्या वस्तूचे मूल्य ठरवतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती