रिलायन्स इंडस्ट्रीजने म्हटले आहे की, “सर्व आवश्यक नियामक मान्यता मिळाल्यानंतर कंपनीची सहाय्यक कंपनी जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडला फेसबुकची संपूर्ण मालकी असलेली , एलएलसी, जाधू होल्डिंग्जकडून 43,574 कोटी रुपये मिळाले आहेत." जिओ प्लॅटफॉर्मवर फेसबुकने 9.99 टक्के हिस्सा घेतला आहे.
जिओ प्लॅटफॉर्मवर फेसबुकने गुंतवणूक जाहीर केल्यानंतर कंपनीत गुंतवणूक करणार्यांची गर्दी झाली होती. फेसबुक व्यतिरिक्त दहा गुंतवणूकदारांच्या अकरा गुंतवणुकीच्या प्रस्तावांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये एकूण 25.09 टक्के इक्विटीसाठी एक लाख 17 हजार 588 कोटी 45 लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. इक्विटी विक्रीनंतरही जिओ प्लॅटफॉर्म पूर्णपणे रिलायन्सची मालकीची संस्था राहील.