सेंट्रल जीएसटी आयुक्तालयाने मेमर्स गोंगुल अग्रो प्रायव्हेट लिमिटेड चांदवड यांनी ५२.८ करोड रुपयांच्या आसपास खोटे इनपुट टॅक्स क्रेडीट विकत घेतले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा ७०.०२ करोड रुपयांचे खोटे इन्हाईस बिल वनउन वितरीत केल्याने त्यात ८.४ करोड रुपये किमतीचे खोटे इनपुट टॅक्स वितरीत केल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणात विशेष बाब म्हणजे वास्तवात कुठल्याही प्रकारचा माल न पाठविताच त्या मालाचे फक्त खोटे बिल बनविले जात होते. यामध्ये जीएसटीच्या कायद्यात विना माल पाठवता इन्हाईस बिल वितरीत करणे दंडनीय अपराध आहे. याप्रकरणी खोट्या बिलामार्फत व्यापार करणे एक गंभीर अपराध असल्या कारणाने सेंट्रल जीएसटी आयुक्तालयाने मेमर्स गोंगुल अग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक राहुल जैन यांना वस्तू व सेवाकर नियम २०१७ च्या नियम ६९ (१) नुसार अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.