थंडी वाढतातच अंडी महागली, दर जाणून घ्या

बुधवार, 13 डिसेंबर 2023 (19:02 IST)
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. काही भागात तापमानात घसरण झाली आहे. हिवाळा सुरु झाला असून अंड्याचा दरात वाढ झाली आहे. अंड्याच्या किमतीत प्रतिनग 2 ते 3 रुपये वाढ झाली आहे. एक डझन अंड्याचे दर 90 ते 100 रुपये झाले आहे. हिवाळ्यात अंडीचे सेवन शरीराला उष्ण ठेवण्यासाठी केले जाते. या साठी हिवाळ्यात अंडीचे सेवन केले जाते. 

कोंबडीचे खाद्य महागल्यामुळे अंडीचे भाव कडाक्याने वाढले आहे.किरकोळ बाजारात अंडीच्या दरात वाढ झाली आहे. आधी अंडी पाच रुपये प्रतिनग च्या दराने मिळत आहे. प्रति डझन 90 रुपयांच्या दराने अंडी विकली केली जात आहे.    
 
हिवाळ्यात अंडीच्या दरात वाढ होते त्यामागील अनेक कारणे आहे. हिवाळ्यात अंडीची खपत खूप जास्त प्रमाणात होते. हैदराबाद वरून येणारी अंडी उत्तर भारतात पाठविली जाते 
त्यामुळे मुंबईत अंडींचा तुटवडा होतो.या मुळे देखील अंडी महागतात.
  
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती