वाढत्या महागाई दरम्यान सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. खाद्यतेलात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कमोडिटीच्या किमतीबाबत मंगळवारी आयएमसीची (IMC) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत एमआरपी, तेलबियांचा स्टॉक लिमिट यावर फेरविचार करण्यात येणार आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीने होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
तेल कंपन्या लवकरच तेलाच्या किंमती कमी करण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांना खाद्यतेलाच्या बाबतीत पुन्हा सुखद दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी आयएमसीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे .एमआरपी, स्टॉक मर्यादेचा पुनर्विचार केला जाईल. या बैठकीत पाम तेलाच्या भविष्याबाबत उद्योग सादरीकरणावरही चर्चा होऊ शकते.