पुण्यातल्या बँकेवर ईडीचा छापा, राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना अटक

शनिवार, 16 जानेवारी 2021 (17:20 IST)
पुण्यातल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर ईडीने छापा टाकला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांच्यासह बँकेच्या 14 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पुण्यातल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेमध्ये 71,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका ईडीने ठेवलाय.
 
या कारवाईदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली आहेत. आमदार अनिल भोसले सध्या तुरुंगात आहेत. अनिल भोसले हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर त्यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेविका आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती