नोटाबंदीच्या निर्णयानंतर गेल्या अडीच महिन्यांपासून देशात असलेली चलन तुटवड्याची स्थिती लवकरच पूर्वपदावर येईल, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटे, यांनी लोकलेखा समितीसमोर साक्ष देताना सांगितले.
चलन टंचाई झळ शहरी मार्गाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक बसली होती. त्यामुळे ग्रामीण भागात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत पीएसी समोर पटेल यांनी माहिती दिली. बँकेत झालेल्या संशयास्पद व्यवहरांवर आर्थिक गुप्तवार्ता विभाग आणि प्राप्तीकर विभाग लक्ष ठेवून आहेत, असेही त्यांनी सांगितले.