क्रेडाई राष्ट्रीय शिखर परिषद 2021

शनिवार, 30 जानेवारी 2021 (12:49 IST)
बांधकाम व्यवसायिकांनी शिवाजी महाराजांसारखा नेतृत्व गुण अंगीकारावा
क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांचे मत  
आगामी काळात शहरीकरणाचा वेग वाढणार : महेश झगडे
नाशिक : समाजात बांधकाम व्यवसायिक म्हणून काम करतांना नेतृत्व करण्याचा गुण आवश्यक असून यासाठी कायमच शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायला हवा असे मत क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष आणि मगरपट्टा टाऊनशिपचे डेव्हलपमेंट आणि कन्स्ट्रक्शनचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांनी व्यक्त केले आहे. क्रेडाई महाराष्ट्रकडून आयोजित करण्यात आलेल्या क्रेडाई राष्ट्रीय शिखर परिषद २०२१च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.    
 
यावेळी क्रेडाई राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई महाराष्ट्र सचिव सुनील कोतवाल, रुस्तमजी ग्रुपचे बोमन ईरानी, क्रेडाई राष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष जितेंद्र ठक्कर, क्रेडाई राष्ट्रीय सल्लागार समितीचे खजिनदार अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव पारीख, सुरेश अण्णापाटील, उमेश वानखेडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
 
क्रेडाईने महाराष्ट्रकडून शहरातील कोर्टयार्ड मॅरियेट येथे दोन दिवसीय राष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलतांना मगर यांनी सांगितले की, व्यवसायात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत आवश्यक आहे पण त्यासोबतच उत्तम प्रकारे नियोजन हवे, कामाचा फोकस हवा जेणेकरून योग्य दिशेने पाऊले पडतील. याशिवाय एकमेकांना सहकार्य करणेही आवश्यक आहे. आगामी काळात खूप मोठे आव्हाने उभी आहेत. यात आर्थिक नियोजनाबरोबरच  कोरोनासारखे अतिशय वेगळे आणि गंभीर संकट देखील आहे. याचा स्वतंत्रपणे विचार करायला हवा. यावेळी त्यांनी यशस्वीपणे नेतृत्व करण्यासाठी १० सूत्रे देखील सांगितली.
आगामी काळात शहरीकरणाचा वेग वाढणार : महेश झगडे
 
उद्घाटन सोहळ्यानंतर निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यानी परिषदेला मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, बांधकाम व्यवसाय हा पुढे आव्हानात्मक होणार आहे. मोठ्या प्रमाणात शहरीकरण होणार आहे.त्यामुळे मोठा व्यवसाय संधी निर्माण होयील. जशी लोकसंख्या वाढते आहे आणि या शतकात लोकसख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यामुळे  नागरिक मोठ्या संख्येने शहरात राहायला येणार आहे. शहरीकरण जोरात होणार आहे. तर तर दुसरीकडे  भांडवलदार हे सध्यां  जग चालवत आहेत. त्यामुळे आर्थिक नियोजन करावे लागेल. कोविड नंतर आता तर  जग खूप बदललय आहे. क्रेडाईसारख्या असोसिएशनने सरकारवर दबाव आणून चुकीच्या गोष्टी थांबवल्या पाहिजे. शहरात योग्य सोयी निर्माण होणे गरजेच आहे.  
 
या परिषदेच्या यशस्वीतेसाठी क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष रवी महाजन, गौरव ठक्कर, अनिल आहेर, सागर शहा, विजय चव्हाणके, कुणाल पाटील, सचिन बागड, राजेश आहेर, नरेंद्र कुलकर्णी, अतुल शिंदे, अनंत ठाकरे, हंसराज देशमुख यांनी परिषदेच्या यशस्वितेसाठी मेहनत घेतली आहे.
 
यावेळी क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव पारीख यांनी क्रेडाई महाराष्ट्रने वर्षभर केलेल्या कामांचा आढावा सादर केला. यामध्ये कोविड काळात केलेल्या कामे, वेगेवेगळ्या कार्यशाळा आदींची माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व सभासदांनी प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर क्रेडाईला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सर्व माजी अध्यक्षाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सुनील कोतवाल यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
 
परिषदेच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात रुस्तमजी ग्रुपचे बोमन ईरानी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, आज आपल्या घरातील मुले हीच आपली  शिक्षक आहेत. मी जेव्हा घर बनवत होतो तेव्हा घराची फोटो कॉपी दाखवून घर ग्राहकाला विकत असे. मात्र आता चित्र खूप बदलले आहे. आता फिल्म दाखवली जाते. व्यवसायात तुम्ही एकमेकांच् विरोधात बोलू नका. ग्राहकाने तुम्हाला पैसे दिले आहेत. तुम्ही ग्राहकाला प्रॉब्लेम सांगू नका. तुम्ही काय आहात हे पाहून ग्राहक तुमच्या येतात. त्यामुळे बाजारात चांगले नाव कमावले पाहिजे. तुम्ही दाखवता तेच बांधा. पैसे कमवायचे म्हणून फसवणूक करू नका. ग्राहक हा राजा असतो. तुमचा ब्रँड आणि पैसे त्यामध्ये ब्रँड ठेवा पैसा गेला तरी चालेल. तुमचा ब्रँड महत्वाचा आहे. तुम्ही विश्वास दिला तर विश्वास जिंकाल.

विकास लागू
दुसऱ्या सत्रात दुसरे व्याख्यान क्रेडाई महाराष्ट्र संयुक्त सचिव विकास लागू यांनी भागीदारी यशस्वी कशी होईल याची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, भागीदारीमध्ये एकट्याने व्यवसाय करणे जोखीम कमी होते. रजिस्टर पार्टनरशिप, लिमिटेड लायबेलीटी आणि कंपनी स्थापन करणे हे प्रकार आहेत. या तिघांचे तीन वेगळे प्रकार आहेत. भागीदारीकडे एक संधी म्हणून पाहणे गरजेचे आहे.
 
 दीपक शिकारपुर आयटी तज्ञ यांनी बोलतांना आधुनिक तंत्रज्ञानामुळे जीवन अजून कसे बदलत जाणार आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला. आधी घड्याळ, बेरीज वजाबाकीसाठी यंत्र, वेगवेगळे फोन अशी उपकरणे असायची. मात्र आता या सगळ्यांची जागा मोबाईलने घेतली आहे. १० वर्षा नंतर लॅपटॉप राहणे नाहीत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती