सर्व सामान्य माणसाला महागाईचा फटका बसणार आहे. काही एफएमसीजी कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमतीत 10 -15 टक्के वाढ करण्याचा विचार करत आहे . रशिया युक्रेन युद्धामुळे गहू, पामतेल, आणि पॅकेजिंग साहित्य महागल्यामुळे कंपन्या वाढ करण्याच्या तयारीत आहे. रशिया- युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचा तसेच गहू, खाद्यतेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. एफएमसीजी कंपन्यांनी साबण, टूथपेस्ट, शाम्पू, चहा, कॉफी, नूडल्सच्या किमतीत वाढ केली आहे. आता सर्व कंपन्या आपल्या उत्पादनाच्या किमतीत 10-15 टक्के वाढ करणार असून सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.