भारतीय रिझर्व बँकेच्या एका आदेशानुसार आपले ATM कार्ड 1 जानेवारी 2019 पासून बेकार होतील. आरबीआयने मॅग्नेटिक स्ट्राइप कार्ड 31 डिसेंबर 2018 पर्यंत EMV चिप असणारे कार्डाने बदलण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षा दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. नवीन EMV चीप कार्ड मॅग्नेटिक स्ट्राइप कार्ड हून अधिक सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. याने फ्राड होण्याचा धोका कमी होईल असेही मानले जात आहे.
काय आहे EMV :
सध्या चीप आधारित डेबिट आणि क्रेडिट कार्ड अत्यंत सुरक्षित मानले जात आहे. ईएमव्ही (युरो, पे, मास्टर कार्ड आणि व्हिसा) मध्ये एक लहान मायक्रो चिप असते ज्यामुळे बोगस ट्रान्झॅक्शनहून सुरक्षा होते.
या प्रकारे जाणून घ्या आपले कार्ड EMV आहे अथवा नाही :
कोणत्याही डेबिट आणि क्रेडिट कार्डात EMV आहे अथवा नाही हे माहीत करणे अत्यंत सोपे आहे. EMV कार्डात वरून डाव्याबाजूला सोनेरी चिप असतं.
SBI ने आपल्या ग्राहकांना दिले निर्देश:
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना एक विशेष SMS द्वारे एटिएम कार्डबद्दल माहिती दिली आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत आपले एटिएम कार्ड न बदलणार्याचे कार्ड ब्लॉक करण्यात येईल असे यात सांगण्यात आले आहे.
नवीन कार्डासाठी ऑनलाईन अप्लाय:
नवीन कार्डासाठी आपण ऑनलाईन बँकिंगद्वारे अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त बँकेत जाऊन देखील अप्लाय करू शकता.