सराफा बाजारात तेजी, सोने प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांवर

शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (08:57 IST)
तब्बल सहा वर्षांनी धनत्रयोदशीआधी सोन्याने प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांवर झेप घेतली असूनही सराफा बाजारात तेजीचे वातावरण आहे. याआधी गेल्या पाच वर्षांत धनत्रयोदशीला सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ३० हजार रुपयांखाली होता. मात्र, सहा वर्षांनंतर सोन्याने प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. २०१२ साली धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याचा दर ३१ हजार ६४० इतका होता. मात्र, यंदा शुक्रवारी सोन्याचे प्रति तोळ्याचे दर ३२ हजार १६० रुपये इतके होते.
 
आॅनलाइन सोने खरेदीतही २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती जाणकारांनी दिली. मात्र, पारंपरिक दागिने खरेदीसाठी आजही ग्राहकांची पसंती सराफा पेढ्यांनाच असल्याचे चित्र आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती