अर्थसंकल्पीय अधिवेशन हे एकूण 35 दिवसांचे असून 22 दिवस कामकाज चालणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी राज्यपालांचे अभिभाषण सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल. राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी दुपारी दोन वाजता सादर करण्यात येईल. या अधिवेशनात विधानसभेत एक विधेयक प्रलंबित तर विधान परिषदेत चार विधेयके प्रलंबित आहेत. याशिवाय चार अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येतील. चार प्रस्तावित अध्यादेश आणि सहा प्रस्तावित विधेयकेही मांडण्यात येणार आहेत.