तालु्रातील ऊस उत्पादक शेतकर्यांचा एकमेव आधारस्तंभ असलेल्या विहाळच्या भैरवनाथ शुगर चालू वर्षीचा गळीत हंगाम वेगाने सुरू असून कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून संपूर्ण उसाचे गाळप करणार आहे. त्याकरिता कारखान्यास ऊस घालणार्या शेतकर्यांना प्रतिटन 2511 रुपये दर देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संरपच काशीनाथ भुजबळ तसेच अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
पुढे बोलताना सावंत म्हणाले, राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी उद्भलेल्या नैसर्गिक परिस्थितीमुळे यावर्षी सर्वच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरु झाला आहे. यामुळे ऊस तोडणी मजूर मोठ्या प्रमाणात राज्याबाहेरील साखर कारखान्याकडे वळाल्याने ऊसतोडणी मजुरा अभावी अनेक कारखान्यांचे काम ठप्प आहे.