पीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचं सहकार्याचं आश्वासन

सोमवार, 16 डिसेंबर 2019 (09:59 IST)
रिझर्व्ह बँकेने मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यामुळे खातेदारांना पैसे काढण्यासाठी त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
 
याच पार्श्वभूमीवर पीएमसीच्या संतप्त खातेदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खासगी निवासस्थानी धडक देत आंदोलन केले. यावेळी मातोश्रीबाहेर हजारो खातेदार जमा झाले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही केली.
 
यानंतर पीएमसीच्या बँकेच्या दोन प्रतिनिधींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पीएमसी बँकेच्या खातेधारकांना धीर दिला. तसेच सरकार म्हणून जे जे सहकार्य करता येईल ते करेन असे आश्वासन दिले. तसेच पुढील चर्चेसाठी 21 आणि 22 डिसेंबर अशी तारीख देण्यात आली आहे.  

मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांची आज पीएमसी बँक खातेधारकांनी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी पीएमसी बँक खातेधारकांना धीर देऊन बँकेच्या खातेधारकांना न्याय देण्यासाठी राज्य शासन योग्य ती कार्यवाही करेल असे आश्वासन दिले. pic.twitter.com/HEBqfGAEuf

— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 15, 2019

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती