फेब्रुवारीमध्ये 'इतक्या' दिवस बँका राहणार बंद

बुधवार, 31 जानेवारी 2024 (10:07 IST)
बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पैशांचे व्यवहार, डिमांड ड्राफ्ट प्राप्त करणे, चेक जमा करणे अशा अनेक कामांसाठी बँकेची आवश्यकता असते. बँकेला सुट्टी असेल तर अनेक वेळा ग्राहकांची महत्त्वाची कामे रखडतात.
 
जर तुम्ही पुढील महिन्यात बँकेशी संबंधित काम करण्याचा विचार करत असाल तर आधी RBI चे कॅलेंडर आजच तपासा. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कॅलेंडरनुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये वीकेंडसह बँका 11 दिवस बंद राहतील. या सुट्यांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. तसेच रविवारची सुट्टीही असणार आहे.  
 
 फेब्रुवारी 2024 मधील बँक सुट्ट्यांची यादी
 
    4 फेब्रुवारी 2024: रविवार
    10 फेब्रुवारी 2024: दुसरा शनिवार
    11 फेब्रुवारी 2024: रविवार
    14 फेब्रुवारी 2024: वसंत पंचमी किंवा सरस्वती पूजा (त्रिपुरा, ओरिसा आणि पश्चिम बंगाल)
    15 फेब्रुवारी 2024 : लुई-नगाई-नी (मणिपूर)
    18 फेब्रुवारी 2024: रविवार
    19 फेब्रुवारी 2024: छत्रपती शिवाजी महाराज जयंती (महाराष्ट्र)
    20 फेब्रुवारी 2024: राज्य दिन (मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश)
    24 फेब्रुवारी 2024: शनिवार
    25 फेब्रुवारी 2024: रविवार
    26 फेब्रुवारी 2024 : न्योकुम (अरुणाचल प्रदेश)
 
 
ऑनलाइन व्यवहार चालू राहणार
देशातील अनेक सणांमुळे काही शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत. मात्र, बँकिंग सेवा खंडित होणार नाही. ऑनलाइन व्यवहार करता येणार आहेत. बँकाच्या सुट्टीच्या तारखा तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट www.rbi.org.in तपासा.

Edited By -  Ratnadeep ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती