शनिवारपासून तीन दिवस देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत. सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने रोख व्यवहार करणाऱ्यानां पैशांची चणचण भासू शकते. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असते तर उद्या रविवार आणि सोमवारी ईदनिमित्त सर्वच बँकांना सुट्टी राहणार आहे. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भार पडल्याने एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या काळात एटीएम कोरडी पडू नयेत यासाठी पुरेशा प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बँकेकडून स्पष्ट केले आहे. रोख रकमेद्वारे व्यवहार केल्याने एटीएमवर भार पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बहुसंख्य व्यवहार ऑनलाइन अथवा डिजिटल माध्यमातून करण्याचे आवाहन बँकांतर्फे करण्यात आले आहे.