Bank Holidays in March: मार्च महिन्यात बँक हॉलिडेची पूर्ण लिस्ट येथे बघा

बुधवार, 6 मार्च 2019 (11:30 IST)
जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर तुम्हाला बँक हॉलिडेची लिस्ट जरूर माहीत असायला पाहिजे. तसेच बर्‍याच लोकांचे कामं बँकेशी निगडित असतात तर त्यांना देखील माहीत असायला पाहिजे की महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहे. बँक हॉलिडे वेग वेगळ्या राज्यांमध्ये वेग वेगळ्या असतात. संपूर्ण देशात बँका फक्त राष्ट्रीय सुट्यांमध्येच बंद असतात. 
 
त्याशिवाय स्थानिक उत्सव आणि राज्यांचे महत्त्वपूर्ण दिवसांमध्ये प्रत्येक राज्यात बँकांची स्थानिक सुटी देखील असते. जर आम्ही मार्च 2019ची गोष्ट करू तर या महिन्यात दोन मोठे सण आहे. एक महाशिवरात्री आणि दुसरा होळी. तर जाणून घ्या मार्च महिन्यात कोणत्या दिवशी कोणच्या राज्यात बँक हॉलिडे राहणार आहे.  
 
4 मार्च सोमवारी महाशिवरात्री असल्याने जास्तकरून राज्यांमध्ये बँकांमध्ये सुट्या राहतात. पण पश्चिम बंगालमध्ये या दिवशी बँकांना सुट्या राहत नाही. त्याशिवाय 20 मार्च (बुधवार)ला होळी असल्यामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडामध्ये सुटी राहणार आहे. 21 मार्च गुरुवारी जास्त करून राज्यांमध्ये बँकांच्या सुट्या राहणार आहे. या दिवशी रंग खेळण्यात येतो.  
 
22 मार्च शुक्रवारी बिहार डे आहे म्हणून या बिहारमध्ये या दिवशी बँकांना सुटी राहील. 23 मार्चला शहीद भगत सिंह यांची पुण्यतिथी असल्यामुळे या दिवशी पंजाब आणि  हरियाणात सुटी राहणार आहे. मार्च 2019 मद्ये एवढ्याच सुट्या आहेत. त्याशिवाय दुसरा आणि चवथ्या शनिवारी बँका बंद राहणार आहे. दुसरा शनिवार 9 मार्चला आहे आणि चवथा शनिवार 23 मार्च रोजी राहणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती