Bank Holidays: मार्च महिन्यात 13 दिवस बँक बंद राहतील, संपूर्ण यादी बघा

शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (10:58 IST)
मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे. होळी आणि महाशिवरात्री हे सणही याच महिन्यात येतात. अशा परिस्थितीत या महिन्यात चे बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर या पूर्वीच करून घ्या. पुढील महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, मार्च 2022 मध्ये बँका 13 दिवस बंद राहतील.
 
मार्च महिन्यातील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी आरबीआयच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँकांच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार मार्च महिन्यात बँका 13 दिवस बंद राहणार आहेत. देशभरातील बँकांमध्ये या सुट्ट्या एकाच वेळी होत नाहीत. RBI ची यादी राज्य आणि शहरानुसार आहे, म्हणजेच सुट्ट्या शहरांवर आधारित आहेत, राज्यांचे स्थानिक सण, त्या त्या दिवसाच्या आधारावर असल्यामुळे फक्त त्या शहरातील बँका बंद असतात.तर, काही सुट्ट्या राष्ट्रीय स्तराच्या असतात, त्यामुळे देशभरातील सर्व बँका बंद असतात.
 
मार्च महिना सुट्टीने सुरू होत आहे. 1 मार्च रोजी महाशिवरात्रीमुळे आगरतळा, आयझॉल, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाळ, कोलकाता, नवी दिल्ली, पणजी, पाटणा आणि शिलाँग येथील बँक शाखा वगळता देशव्यापी बंद राहणार आहे. तर, गंगटोकमध्ये 3 मार्चला लोसारमुळे बँका बंद राहणार आहेत. छप्पर कुटमुळे आयझॉलमधील बँका 4 मार्चला बंद राहतील. 17 मार्चला होलिका दहन निमित्त डेहराडून, कानपूर, लखनऊ आणि रांचीमध्ये बँका बंद राहतील. होळीमुळे 18 मार्च रोजी बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोलकाता, तिरुवनंतपुरम वगळता देशभरात बँका बंद राहतील. 19 मार्च रोजी भुवनेश्वर, इंफाळ आणि पाटणा येथे बँकांना सुट्टी असेल. बिहार दिनानिमित्त पाटण्यातील बँका 22 मार्चला बंद राहतील.
 
6 मार्च, रविवार, 12 मार्च, महिन्याचा दुसरा शनिवार, 13 मार्चला रविवार, 20 मार्चला रविवार, 26 मार्चला महिन्याचा चौथा शनिवार आणि 27 मार्चला रविवार असल्यामुळे देशभरातील बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती