डीजीसीएने मार्च अखेरपर्यंत देशांतर्गत विमान सेवा स्थगित केली होती परंतू करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केल्याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवा १४ एप्रिलच्या मध्य रात्रीपासून सुरू होईल, अशी अपेक्षा नागरी हवाई विमान वाहतूक संचालनालयाने व्यक्त केली आहे.
२१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार आहे. यामुळे देशांतर्गत विमानसेवेवरील बंदी डीजीसीएने वाढवली आहे. आता आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत, चार्टर आणि खासगी विमानांची वाहतूक १४ एप्रिलच्या मध्य रात्रीपासून सुरू होईल, असं डीजीसीएने स्पष्ट केलं आहे.