Air India-Vistara Merger :भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) विस्तारा एअरलाइनचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. टाटा एसआयए एअरलाइन्स भारतात विस्तारा नावाची एअरलाइन चालवते. हा टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइनचा संयुक्त उपक्रम आहे. यासोबतच सीसीआयने सिंगापूर एअरलाइन्सकडून एअर इंडियामधील काही शेअर्स खरेदी करण्यासही मान्यता दिली आहे. मात्र, यासाठी सिंगापूर एअरलाइन्सला काही अटींचे पालन करावे लागणार आहे.