जातिकीट बूक करताना आधार कार्ड दाखवले नाही तर ज्येष्ठ नागरिक कोट्यातील सवलतीपासून त्यांना मुकावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकीट आऱक्षण आधार कार्डशी संलग्न करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यापासून आधार कार्ड बंधनकारक असेल अशी माहिती अधिकार्याने दिली आहे. रेल्वे स्टेशनवर जाऊन तिकीट काऊंटरवर किंवा ई-तिकिट बुकिंग करताना दोन्ही वेळा हा नियम लागू असणार आहे.