7th Pay Commission:मोठी बातमी, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 14 टक्के वाढ, 10 महिन्यांचा एरियर ही मिळणार
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आदेश जारी करताना सरकारने या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 10 महिन्यांची थकबाकी दिली जाईल, असे म्हटले आहे. यासोबतच त्यांच्या महागाई भत्त्यात 14 टक्क्यांनी वाढ होणार आहे. मात्र, रेल्वे बोर्डाने डीएमध्ये दोन भागांत वाढ केल्याचे कळते. 1 जुलै 2021 पासून महागाई भत्त्यात 7 टक्के आणि 1जानेवारी 2022 पासून 7 टक्के वाढ करण्यात आली आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिली 7 टक्के वाढ लागू होईल.
सध्या सहाव्या वेतन आयोगांतर्गत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना १८९ टक्के डीए मिळत आहे. या कर्मचाऱ्यांचा डीए 1 जुलै 2021 पासून केवळ 196 टक्क्यांच्या आधारे वाढवला जाईल. त्याचप्रमाणे, 1 जानेवारी 2022 पासून 7 टक्क्यांच्या वाढीसह, ते कर्मचार्यांसाठी 203 टक्के होईल.
पगारात मोठी वाढ होणार आहे
दोन्ही वेतनवाढी एकत्र केल्यास कर्मचाऱ्यांना त्यांचे मे महिन्याचे वेतन 10 महिन्यांच्या थकबाकीसह दिले जाईल. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि 10 महिन्यांची थकबाकी एकाच वेळी दिली तर त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.