जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूकदारांची एक मोठी रांग लागली आहे. एका महिन्यात कंपनीला पाचवा मोठी गुंतवणूक मिळाली आहे. आता अमेरिकेची कंपनी केकेआर जिओ प्लॅटफॉर्मवर 11,367 कोटींच्या गुंतवणुकीद्वारे 2.32% इक्विटी भागभांडवल खरेदी करेल.
आतापर्यंत फेसबुक, सिल्व्हर लेक, व्हिसात इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक यांनी जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केली आहे आणि आता केकेआरच्या गुंतवणुकीने कंपनीची एकूण 78 हजार 562 कोटींची गुंतवणूक आहे.