रिझर्व्ह बँके (RBI) ने लवकरच 20 रुपयांची नवीन नोट चलनामध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी सिरींज अंतर्गत चलनात येणार्या या नोटेवर गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे हस्ताक्षर असतील. नोटेचा रंग हिरवा-पिवळा असा असेल. नोटेच्या मागे देशाची सांस्कृतिक वारसा दर्शवणारी एलोरा गुहा चित्रे असतील. या नोटचा आकार 63mmx129mm असेल.
2. देवनागरी लिपीत २० लिहिले आहे.
3. मध्ये महात्मा गांधी यांचे चित्र.
4. मायक्रो लेटर्स मध्ये 'RBI', 'भारत', 'INDIA' आणि '20'
उल्लेखनीय आहे की नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटांसह 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये आणि 10 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. आता लवकरच 20 रुपयांची नवी नोट चलनात येणार आहे.