‘ती’ कंपनी देणार सर्वात स्वस्त एलईडी टीव्ही

सोमवार, 27 जून 2016 (10:50 IST)
रिंगिंग बेल्स कंपनीने 251 रुपयांमध्ये स्मार्टफोन देण्याचा दावा केला. आता रिंगिंग बेल्स कंपनी 10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत 32 इंच एचडी एलईडी टीव्ही विकण्यास सज्ज झाली आहे. कंपनी 1 जुलैपासून हा टीव्ही लॉन्च करणार आहे. सध्या या 32 इंच हाय-डेफिनेशन एलईडी टीव्हीला लॉन्च करण्याची तयारी रिंगिंग बेल्स करत आहे. 
 
विशेष म्हणजे या टीव्हीचे नावही फ्रीडम ठेवण्यात आले आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात हा टीव्ही लॉन्च करण्यात येणार आहे. यावर गोयल यांनी सांगितले, भारतात 10 हजार रूपयांहून कमी किंमतीचा एलईडी टीव्ही उपलब्ध नसल्यामुळे फ्रीडम भारतातील सर्वात स्वस्त टीव्ही असणार आहे. 
 
हा टीव्ही ऑनलाइन माध्यमातून ग्राहकांना खरेदी करता येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. मुख्य म्हणजे ग्राहकांना फार काळ ताटकळत राहावे लागणार नाही. ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर कॅश ऑन डिलिव्हरीवर ग्राहकांना टीव्ही उपलब्ध होईल. 
 
रिंगिंग बेल्स कंपनीने 251 रुपयांमध्ये जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन देण्याचा दावा केला होता. हा दावा आता पूर्णत्वास येणार आहे. 30 जूनपासून ऑनलाइन बुकिंग करून कॅश ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून स्मार्टफोनची विक्री सुरू करण्यात येणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा